Education Images
Education Images
Education Images
स्थापना व परिचय

गोविंदपूर ग्रामपंचायत बद्दल

गावाचा इतिहास गोविंदपुर हे गाव अठराव्या शतकाच्या पुर्वार्धात बसवल्या गेले हे गाव अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यामध्ये समाविष्ट असुन अमरावती पासुन 60 कि. मी. अंतरावर आहे. सदर गावाची ग्रामपंचायत स्थापन 1960 साली करण्यात आली. गावाची सन 2011 च्या गनगणेनुसार 1365 लोकसंख्या आहे.

गावाचे पहीले सरपंच म्हणुन श्री. पुंडलिकराव केशवराव सोलव यांना मान मिळाला. हे गाव संपुर्ण अंधारात असतांना गावाचे सरपंच श्री. पुंडलिकराव केशवराव सोलव यांनी स्वताचे 4 एक्कर शेत विकुण त्या काळात गावात 7 विद्युत खांब बसवून गावात विद्युत आणली. या गावामध्ये जि.प.शाळा असुन येथिल शिक्षक वृंद मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांना शिकवितात. शाळा पुर्ण डीजीटल आहे. गावातील लोकांचा सहभाग सुद्धा शाळेच्या प्रगती साठी मोठ्या प्रमाणावर आहे..

संपुर्ण गावाचे विद्युतीकरण झालेले आहे. गावक-यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असुन येथे नविन तंत्रज्ञानाचा वापर करून संत्रा फळ पिक घेतल्या जाते. संपुर्ण गावावर ग्रामपंचायत गोविंदपुरचे नियंत्रण आहे. गावात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात आहे. गावात कोणत्याही प्रकारचा तंटा नसून गावात संपुर्ण दारुबंदी आहे.

गावातील लोकं शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतात. गावातील लोकं शौचालयाचा नियमित वापर करतात. गाव पुर्णपणे सन २०१८ मध्ये हागनदारी मुक्त झाले आहे. गावातील लोकं एकजुटीने राहतात. सर्वांनमध्ये सहकार्याची भावना आहे.

संक्षेप

स्थापना: 1960

गाव/वसुती: 1

एकत्रित लोकसंख्या: 1365

एकूण मालमत्ता: 348

स्थानिक स्वराज्य संस्था रचना

ग्रामपंचायत: गावस्तर

पंचायत समिती: तालुकास्तर

जिल्हा परिषद: जिल्हास्तर

राज्य शासन

केंद्र शासन

महसुली गाव — तपशील

महसुली गाव — तपशील

गोविंदपूर हे गाव (गोविंदपूर) • (जिल्हा.अमरावती ) महामार्ग वर चांदुर बाजार पासून 40 KM अंतरावर आहे. गोविंदपूर गावाचे आराध्य दैवत लोढाई माता हे आहे गावा लागत असलेल्या सिंचन तलावामुळे शेतकरी संत्रा लागवडीस प्राधान्य देत असल्याने संत्रा पिकाच्या लागवडीत वाढ झालेली आहे

क्षेत्रफळ 6.764 km²
एकूण लोकसंख्या 1365
पुरुष / स्त्री 758 / 673
एकूण मालमत्ता 348
मुख्य व्यावसाय शेती, दुग्धव्यवसाय
मुख्य पिके संत्रा
आपले प्रतिनिधी

गावाचे मार्गदर्शक

गोविंदपूर ग्रामपंचायतच्या कामकाजासाठी सरपंच आणि ग्रामसेवक हे गावातील विकास आणि नागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यरत आहेत. त्यांचे अनुभव आणि समर्पण गावाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी आहेत.

Corporate Template

सचिन गोवर्धनराव सोलव

सरपंच
९७३०४८१४५६
Corporate Template

श्यामसाद परविन मो. रझीक

उपसरपंच
७४९८२१९८१०
Corporate Template

सुरेश मधुकरराव रेखाते

ग्रामसेवक
९७६६९३७९८६

संपर्क आणि आवश्यक सुविधा

ग्रामपंचायत कार्यालय आणि गावातील महत्वाच्या सुविधा (पोलीस, आरोग्य, वीज, शाळा इ.) यांचे संपर्क येथे मिळतील.

ग्रामपंचायत कार्यालय

फोन: ९७३०४८१४५६

ईमेल: gp_govindpur@rediffmail.com

ग्रामपंचायत कार्यालय — पत्ता

गोविंदपूर ग्रामपंचायत पंचायत समिती चांदुर बाजार जिल्हा अमरावती

ग्रामपंचायत सदस्य माहिती

नाव पदनाम मोबाइल नंबर वार्ड नं क्रिया
सचिन गोवर्धनराव सोलव सरपंच ९७३०४८१४५६ १,२,३ Call
श्यामसाद परविन मो. राजीक उपसरपंच ७४९८२१९८१० Call
अरुण पुंडलिकराव सोलव सदस्य ७२१८२१९२७५ Call
सुधीर प्रल्हादराव डोफे सदस्य ९७६३९६८३१६ Call
विनोद चंद्रभानजी बन्सोड सदस्य ९२२६२९९७६८ Call
सौ. अर्चना कैलास गजबे सदस्य ७०५८३०९४६७ Call
सौ. अंजली नंदू वरघट सदस्य ८६६९३२७५८० 1 Call
सौ. ज्योती सतीश धामडे सदस्य ९७६७७०३१६७ Call